माजी सभापती घाडीगांवकर यांच्या पाठपुराव्यामुळे दत्ता सामंत यांनी शिरवंडे दिपमाळवाडी ग्रामस्थांना स्वखर्चाने बांधून दिला नवा साकव…!

⚡मालवण ता.२२-:
शिरवंडे दिपमाळवाडी येथील जुना साकव जीर्ण होऊन कोसळल्यामुळे ग्रामस्थांची झालेली गैरसोय लक्षात घेवून मालवणचे आमदार निलेश राणे यांनी याठिकाणी नवीन साकव मंजूर केला असून नवा साकव पुर्ण होईपर्यंत आता पावसाळ्यात येथील शेकडो ग्रामस्थ, विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून याठिकाणी पर्यायी मार्ग निर्माण केला आहे. माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्या पाठपुराव्यातून येथील ग्रामस्थांची ही समस्या मार्गी लागली आहे.

मालवण तालुक्यातील शिरवंडे दीपमाळवाडी येथील साकव हा जीर्ण झाल्यामुळे मोडकळीस आला होता ही गोष्ट दीपमाळवाडी येथील ग्रामस्थांनी मालवणचे माजी सभापती सुनील घाडीगावकर यांच्या कानी घातल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना याबाबतची माहिती दिली श्री दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन याठिकाणी स्वखर्चाने साकव बांधून दिला आहे ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सुनील घाडीगावकर यांचे आभार मानले आहेत

फोटो :

शिरवंडे दिपमाळवाडी येथे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांच्या सोईसाठी स्वखर्चातून बांधून दिलेला साकव

You cannot copy content of this page