⚡बांदा ता.१३-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ या शाळेचा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. प्रशाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत चमकले. रिया सावंत हिने २४६ गुण मिळवत जिल्ह्यात १५ वा तर काव्या कोठावळे हिने २१६ गुण मिळवत जिल्ह्यात ६२ वा क्रमांक मिळविला.
श्रुतिका राजगोळकर २०२ गुण तर आस्था सावंत हिने १८२ गुण मिळवून यश संपादन केले. इन्सुली केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पदाधिकारी यांनी गुणवत्ताधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक सुधीर गावडे यांचे सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर माजगावकर, समीर जाधव, श्री आरोसकर, श्री मडगावकर, श्रीमती बांदेकर, श्री सावंत, श्री चव्हाण, श्री होडावडेकर, प्रवीण शेर्लेकर, हंसराज गवळे यांच्यासह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पदाधिकारी व पालक उपस्थित होते.
फोटो:-
इन्सुली येथे विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन करताना मान्यवर.
