कणकवलीत BSNL नेटवर्क गुल्ल…

कणकवली : तालुक्यातील BSNL नेटवर्क बुधवारी सकाळपासून गुल्ल झाले आहे. आठवड्यातून किमान चार दिवस असे प्रकार होतच असतात. नेटवर्क सेवा सुरळीत करण्याची मागणी होत असतानाच दिवसेंदिवस BSNL नेटवर्क मात्र अधोगतिकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येते. ऐन सनासुतीचे दिवस असतानाच BSNL नेटवर्क गुल्ल होत असल्याने नेटवर्क वापरकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी बीएसएनएल सेवा सुरळीत करण्यासाठी गांभीर्याने पाहतील का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

You cannot copy content of this page