सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . वसंत गवसचे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश…

⚡सावंतवाडी ता.११-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा पंचम खेमराज हायस्कूल , बांदा येथे शनिवार दि. ९ .०८.२०२५ रोजी संपन्न झालेल्या शालेय तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . वसंत संदिप गवस याने चौथा क्रमांक पटकावला आहे .कु . वसंत गवस जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी सावंतवाडी तालुक्याचे
प्रतिनिधित्व करणार आहे. कु . वसंत याला प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा तसेच त्याच्या पालकांनीही मार्गदर्शन केले .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी कु . वसंत गवस याचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

You cannot copy content of this page