शिवसेना मालवण उपशहर प्रमुखपदी अभय कदम…

⚡मालवण ता.१०-:
शिवसेना मालवण उपशहर प्रमुखपदी अभय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी अभय कदम यांना नियुक्तीपत्र दिले.

यावेळी जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, शिवसेना सरपंच संघटना तालुका प्रमुख शाम वाक्कर, शहरप्रमुख दिपक पाटकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर, विभागप्रमुख मंदार लुडबे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page