मळेवाडा सबस्टेशनला उद्या सत्यनारायण पूजेसह महाआरती करून अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडणार: आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जागेची केली आज पाहणी..
⚡सावंतवाडी ता.०९-: महावितरण विभागाच्या भोंगाळ कारभारा विरोधात माळेवाडा सबस्टेशनला उद्या रुपेश राऊळ सत्यनारायण पूजेसह महाआरती करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याचा ठरवलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज मळेवाड येथील सबस्टेशनला भेट देत जागेची केली पाहणी. दरम्यान उद्या सायंकाळी चार वाजता सत्यनारायण पूजा तर साडेपाच वाजता महाआरती करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करून महावितरणच्या भोंगा कारभाराचा ते निषेध करणार आहेत.
यावेळी जागेची पाहणी करताना विभाग प्रमुख आबा केरकर, गुरुनाथ नाईक, अशोक धुरी, प्रशांत बुगडे, नम्रता झारापकर, मुन्ना मुळीक, रवी तळवणेकर, अर्जुन मुळीक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
