शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच चराठा शाळेचा पहिला नंबर..

संजू परब ; संजू परब ; बेस्ट शाळा म्हणून पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल शिक्षकांचा केला सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०६-: शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे आज शाळेचा पहिला नंबर आला. त्यामुळे मी सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो असे गौरउद्गार संजू परब यांनी आज येथे काढले. येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ चा पीएमसी मधून बेस्ट शाळा म्हणून पहिला क्रमांक जिल्ह्यात आल्याबद्दल आज संजू परब यांनी शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच मुलांना खाऊ वाटप करून अभिनंदन केले.

यावेळी परब बोलताना म्हणाले शाळेला जी काही मदत लागेल ती आपण निश्चितच करू शिक्षकांनी आपल्याला अनेक शाळेबाबत व्यक्त सांगितले तसेच शाळेच्या बाहेरील संरक्षण भिंत देखील धोक्यात आहे ती देखील कुठल्या माध्यमातून निधी देता येईल का त्यासाठी आपण प्रयत्न करू न झाल्यास आपण स्वखर्चाने ती भिंत बांधून देऊ असे आश्वासन देखील उपस्थित शिक्षकांना दिले.

यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश परब ,सरपंच प्रचिती कुबल,बाळू वाळके, राजू कुबलक्लॅटस फर्नांडीस, मुख्याध्यापिका पेडणेकर मॅडम, कुंभार मॅडम, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page