पाट हायस्कूलमध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा..

कुडाळ : तालुक्यात पाट हायस्कूलमध्ये विविध कलात्मक उपक्रम दरवर्षी राबविले जातात. यामध्ये सर्वच शिक्षकांचा सहभाग असतो. यावर्षीही रक्षाबंधनानिमित्त मुलांकडून राख्या बनविण्यात आल्या.
विविध रंगसंगतीच्या कलात्मक राख्यांची निर्मिती कला, कार्यानुभव आणि आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत तयार करण्यात आल्या. सौ दीपिका सामंत आणि त्यांचे सहकारी आणि विद्यार्थ्यांमार्फत या राख्यांची निर्मिती करण्यात आली. राखी बनवण्याचा उपक्रमही दरवर्षी घेण्यात येतो.
या कार्यशाळेस मुख्याध्यापक श्री राजन हंजनकर पर्यवेक्षक श्री बोंदर सर उपस्थित होते . विद्यालयामध्ये गणेश मूर्ती कार्यशाळा, शुभेच्छा कार्ड तयार करणे स्टोन आर्ट, काष्ट शिल्प असेही उपक्रम कलाशिक्षक संदीप साळस्कर घेत असतात. संस्था चालकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

You cannot copy content of this page