कुडाळ : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कणकवली मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १२ ते रविवार १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रोज सकाळी ६ ते ८.३० या वेळेत हॉटेल उत्कर्ष, एसटी स्टँड समोर, कणकवली येथे हे शिबीर होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
18 वर्षांवरील सर्वांसाठी हे शिबिर खुले आहे. जगप्रसिद्ध व जीवनाला कलाटणी देणारी दिव्य सुदर्शन क्रिया या शिबिरात तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली शिकवली जाणार आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, तणावमुक्त होण्यासाठी, अस्वस्थता कमी होण्यासाठी, सकारात्मकता वाढविण्यासाठी, उत्साह वाढण्यासाठी, निरोगी , शांत व आनंदी जीवन जगण्यासाठी, मानसिक व भावनिक स्वास्थ्यासाठी, आरोग्याची खरी काळजी घेण्यासाठी हे शिबीर करणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
अधिक माहिती साठी आणि प्रवेश घेण्यासाठीउमेश : 9657479866, राखी : 9404944628, संदिप : 9890896825, योगेश : 9975355387 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच बरोबर http://aolt.in/889254 या रजिस्ट्रेशन लिंक द्वारे सुद्धा प्रवेश निश्चित करता येणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कणकवलीत १२ पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबिर…
