लॉकडाऊन नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी भरारी पथके…

मुख्याधिकारी जिरगे यांची माहिती

*💫मालवण दि.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोना साखळी तोडण्यासाठी दि. १५ मे पर्यंत मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम मालवण नगरपरिषदतर्फे हाती घेतली असून मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती मालवण नगरपालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व ठोस उपाययोजना हाती घेण्यासाठी मालवण नगरपालिकेने नेमलेल्या भरारी पथकात पथक प्रमुख विजय रावले, सुभाष कुमठेकर, बस्त्याव फर्नांडीस, वीणा पारधी, अनिकेत चव्हाण, आनंद वळंजू, रत्नकांत गावकर, बाळकृष्ण जाधव यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मालवण शहरात नियोजित वेळेनंतर दुकाने चालू असल्याचे दिसून आल्याने आतापर्यंत पाच व्यावसायिकांवर तर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर भरारी पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास त्यांच्यावर साथरोग आटोक्यात येईपर्यंत किंवा कायमस्वरूपी दुकाने सील करण्यात येतील अशी सक्तीची समज देण्यात आलेली आहे. तसेच उपरोक्त आदेशांचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० (४५) यांच्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही नगरपालिकेने म्हटले आहे.

You cannot copy content of this page