इर्टीगा कारची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी…!

⚡बांदा ता.०१-: तालुक्यातील धवडकी येथून मोपा एअरपोर्ट येथे कामाला जात असताना समोरून वेगाने येणाऱ्या इर्टीगा कारची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मंगेश सरदेसाई ( ४४, रा. धवडकी ) हा युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला त्वरित उपचारार्थ गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. जुन्या मुंबई गोवा महामार्गाच्या इन्सुली घाटीतील सात जांभळी परिसरातील वळणावर सकाळी ११ च्या सुमारास अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे इर्टीगा कारच्या मालकाला संपर्क साधला असता चालक गाडी घेऊन गेला आहे आपल्याला याबाबत काही माहिती नाही अशी भूमिका त्याने घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस याबाबत अधिक तपास करीत असून घटनास्थळावरून फरार झालेल्या इर्टीगा चालकाचा शोध घेत आहेत. या तपासात सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, सिद्धार्थ माळकर, केदार पालकर, आणि तेली हे अधिकारी सहभागी होते.

You cannot copy content of this page