रविशंकर डोकोजू:मालवण काळसे माऊली मंदीर येथे १० हजार फळझाडे रोप वाटप शुभारंभ..
⚡कुडाळ ता.०१-: धरणीमातेचे ऋण व्यक्त करण्यासाठीच डोकोजू धन्यवाद उपक्रम हाती घेतला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५ वर्षात ५० हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प रविशंकर डोकोजू फाऊंडेशन बेंगलोर व रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून पूर्ण करणार असल्याचे बेंगलोरचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व रविशंकर डोकोजू फाऊंडेशनचे अध्यक्ष रविशंकर डोकोजू यांनी सांगितले. मालवण तालुक्यातील काळसे गावातील माऊली मंदीर येथील शेतकऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना फळझाडेरोप वितरित करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव पवार, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने,डोकोजू फाऊंडेशन बेंगलोरचे नील जोसेफ, गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे, रोटरी क्लब ऑफ कुडाळ सचिव मकरंद नाईक, खजिनदार राकेश म्हाडदळकर, एकनाथ पिंगुळकर, नीता गोवेकर, रविंद्र परब, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल सचिव दिपक आळवे, खजिनदार प्रथमेश सावंत, काळसे सरपंच सौ विशाखा काळसेकर, सुधेंद्र डोकोजू, वयंम फाॅरेस्ट नर्सरीचे प्रथमेश काळसेकर, सेमंथकचे मोहमद शेख, माऊली देवस्थान चे विष्णू प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.
बेंगलोरचे रोटेरियन व डोकोजू फाऊंडेशन चे संस्थापक रविशंकर डोकोजू यांनी रोटरी फाऊंडेशनला १०० कोटी रूपये दान करून नवा आदर्श निर्माण केला आहे. रविशंकर डोकोजू यांनी गोवा व सिंधुदुर्ग मध्ये १ लाख वृक्षारोपण करून झाडे जगवण्याचा संकल्प केलेला आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे सहकार्य त्यांना लाभत असल्याचे गजानन कांदळगावकर यांनी व्यक्त केले.
काळसे सरपंच सौ विशाखा काळसेकर यांनी डोकोजू धन्यवाद उपक्रम शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असून मी रविशंकर डोकोजू व रोटरी क्लब ऑफ कुडाळचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते असे प्रतिपादन केले. यावेळी काळसे हायस्कूल च्या शालेय विद्यार्थ्यांना फळझाडेरोप वितरित करण्यात आली.
धामापूर येथील प्रसिद्ध सम्यांतक या संस्थेला रविशंकर डोकोजू यांनी सदिच्छा भेट देत कोकणातील प्राचीन संस्कृतीची माहिती सम्यांतक मोहमद शेख यांचेकडून घेतली व संस्थेचे विशेष कौतुक केले. सूत्रसंचालन सचिन मदने यांनी तर आभार राजीव पवार यांनी व्यक्त केले.