महेश सारंग यांचे थेट संजू परबांना आवाहन: तर नगराध्यक्ष असताना सावंतवाडीत काय दिवे लावले हे जनतेला ठाऊक…
⚡सावंतवाडी ता.३०-:* नगराध्यक्ष असताना सावंतवाडीत काय दिवे लावले हे सर्व जनतेला ठाऊक आहे त्यामुळे संजू परब यांची भाजपवर व जिल्हाध्यक्षांवर बोलण्याची पात्रता नाही ज्या पक्षांनी तुम्हाला उमेदवारी दिली त्याच्यावर बोलणं कितपत योग्य असा सवाल करत महेश सारंग यांनी संजू परबांनवर जोरदार टीका केली. दरम्यान तुमच्यात जर एवढी हिंमत असेल तर येत्या आठ दिवसात तुम्ही पक्षप्रवेश घेऊन दाखवा आम्ही पुन्हा शून्यातून पालकमंत्री खासदार प्रदेशाध्यक्ष यांच्या माध्यमातून पक्ष उभा करू असे थेट आवाहन देखील सारंग यांनी यावेळी दिले. ते भाजप कार्यालयात बोलत होते.
सारंग पुढे म्हणाले येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला स्वबळावर लढायचं आहे त्या संदर्भात देखील आम्ही वरिष्ठांना कळवलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही सर्व निवडणुका जिंकून दाखवू आणि शिंदे शिवसेनेची परिस्थिती तुम्हाला कळेल अशी जोरदार टीका महेश सारंग यांनी यावेळी केली. दरम्यान ज्या नेत्याला तुम्ही गुरु मानता त्या नेत्याचा पक्ष पूर्ण हा कितपत योग्य आहे असा सवाल देखील सारंग यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे संजू परब यांनी आम्हाला आव्हान देण्याचं भाषा करू नये आमची काय ताकद आहे ते येणाऱ्या निवडणुकीत दिसेल असे सारंग यांनी यावेळी स्पष्ट केले. तर या आधी देखील संजू परब अनेक वेळा भाजप कार्यकर्त्यांकडे जाऊन पक्षप्रवेशाची विनंती केली आहे या संदर्भात देखील मी निलेश राणे व दीपक केसरकर यांच्याकडे तक्रार केलेली आहे असे सारंग यांनी यावेळी स्पष्ट केले. तर आम्ही केसरकारांना निवडून आणण्याचा देखील मोठा वाटा उचललेला होता त्यावेळी शिंदे सेनेची ताकद कुठे होती असा सवाल ही सारंग यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, रवी मडगावकर, महेश धुरी दिलीप भालेकर, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, आदी उपस्थित होते.