रुपेश रऊळ: पालकमंत्री बैठका घेऊन देखील मात्र प्रश्न सुटत नाही, खासदार स्थानिक आमदार गायब, जनतेने जायचं कोणाकडे..?
⚡सावंतवाडी ता.३०-:
सावंतवाडी तालुक्यात महावितरणच्या कारभाराविरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे दिवसाला दहा ते पंधरा वेळा लाईट जात असताना महावितरण स्मार्ट मीटर कडे जनतेला कुठलीही कल्पना न देता बसवले जात आहेत या सर्व गोष्टीला जनता अक्षरशा कंटाळली आहे महावितरणच्या विरोधात अनेक तक्रारी आमच्याकडे आले आहेत त्यामुळे आता ठाकरे शिवसेना महावितरणच्या विरोधात पंधरावडा म्हणून साजरा करण्याच ठरवलं असून येत्या १० ऑगस्टला माळेवाडा सब स्टेशनला महाआरती तर 15 ऑगस्ट ला महावितरण कार्यालयात शिवसेनेच्या वतीने महाआरती करून हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिली.
ते पुढे बोलताना म्हणाले पालकमंत्री वारंवार बैठका घेता येत मात्र महावितरणचा प्रश्न अद्याप का सुट्टा सुटेना चतुर्थी सन देखील तोंडावर आलेला आहे त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांना कुठेतरी चांगली बुद्धी मिळू याकरिता शिवसेने महाआरती करणार असल्याचे देखील रुपेश राऊळ यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील खासदार स्थानिक आमदार हे गायब आहेत त्यामुळे जनतेने जायचं कोणाकडे असा प्रश्न देखील त्यांना पडतोय त्यामुळे या सर्व गोष्टी पाहता आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून महावितरणच्या विरोधात पंधरावडा म्हणून साजरा करण्याचा ठरवलं असल्याचं राऊळल यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, शहर प्रमुख शैलेश गंवढळकर, अशोक गावकर आदी यावेळी उपस्थित होते