रुपेश राऊळ: उपरकरांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मान राखावा..
⚡सावंतवाडी ता.३०-: मोरक्या आणि दलालांना भीक घालणारे आम्ही शिवसैनिक नव्हे आम्ही पक्षप्रमुखांच्या आदेशावर चालणारे आम्ही शिवसैनिक आहोत त्यामुळे परशुराम उपरकरांनी नाहक आपल्या पदाधिकाऱ्यांची दिंडोरे काढू नये ,त्यांनी शिवसैनिकांचा मान राखावा असं थेट आवाहन रुपेश राऊळ यांनी केले.
दरम्यान शिवसेना ही शिस्त पद्धतीने चालणारा पक्ष त्यामुळे कोणी येऊन इथे जर काय करत असतील तर ते चुकीचे आहे त्यांनी तालुकाप्रमुख शहरप्रमुखांची परवानगी घेतली पाहिजे असा आमचं म्हणणं होतं असेही राऊळयांनी यावेळी स्पष्ट केले. तर या सर्व गोष्टी संदर्भात आम्ही पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवलेलं आहे जेव्हा ते आम्हाला बोलतील तेव्हा आम्ही त्यांच्याकडे सविस्तर बोलू असे राऊळ यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे हा विषय आता इकडेच संपलेला आहे अस देखील त्यांनी जाहीर केले.