विविध कामासंदर्भात वेधले लक्ष: स्थानिक आमदार व निलेश राणेंच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू, संजू परबांच आश्वासन..
⚡सावंतवाडी ता.३०-: कास गावातील विकास काम रखडल्यामुळे आज गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांची भेट घेत लक्ष वेधले, यावेळी त्यांनी संजू परब यांच्यासोबत गावातील विकास कामासंदर्भात चर्चा केली. दरम्यान आपण या संदर्भात लक्ष देऊन विकास कामांबाबत स्थानिक आमदार व निलेश राणेंच्या कानावर घालून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देखील यावेळी परब यांनी उपस्थितांना दिले.
यावेळी शांताराम पंडित, सुधीर पंडित, नागेश कासकर, गुंडू पंडित सुनील पंडित,प्रदीप पंडित,उदय कासकर,कृष्णा पंडित,आत्माराम कासकर, आदी उपस्थित होते.