⚡मालवण ता.२९-:
महाराष्ट्र शासनाचा कोकण विभागस्तरीय डाॅ. एस्. आर. रंगनाथन ग्रंथ मित्र पुरस्कार मालवण येथील नगर वाचन मंदिरचे ग्रंथापाल संजय शिंदे यांना जाहीर झाला आहे.
आजवरच्या ग्रंथालय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन संजय शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप रु. २५ हजार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे असून या पुरस्काराचे वितरण दि. १२ ऑगस्ट रोजी मुंबई येथे एका समारंभात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संजय शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.