संदीप गावडे:मित्रमंडळींच्या उपस्थितीत संदीप गावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..
⚡सावंतवाडी ता.२९-: राजकीय जीवनात व आयुष्यात वाटचाल करीत असताना सर्वसामान्य जनतेचे नेहमीच प्रेम मिळाले. जनतेचे प्रेम आणि आमचे नेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व भाजपचे सर्वच वरिष्ठ नेते यांचे आशीर्वाद यामुळेच आजपर्यंत यशस्वी वाटचाल करु शकलो. यापुढेही जनतेच्या सेवेसाठीच काम करणार, असा विश्वास भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी शहरातील शिल्पग्राम हॉटेलमध्ये संदीप गावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेडणेकर, सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, अनिकेत आसोलकर, चैतन्य सावंत, किसन धोत्रे, नारायण पेंडुरकर, अभिषेक लाखे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमोद गावडे यांनी संदीप गावडे यांना शुभेच्छा दिल्या. संदीप गावडे यांच्या शांत व संयमी स्वभावामुळेच ते इथपर्यंत पोहोचू शकले. यापुढेही त्यांनी उत्तरोत्तर असेच यश संपादन करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
तर सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनीही संदीप गावडे यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, फणसवडेसारख्या सह्याद्री पट्टयातील ग्रामीण भागात जन्म घेतलेल्या संदीप गावडे यांनी मुंबई उपनगरातील डोंबीवली येथे उच्च शिक्षण घेऊन आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरूवात केली. मात्र, त्यानंतर आपल्या मूळ गावी परतून त्यांनी सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचे व्रत स्वीकारले. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यामातून वाटचाल सुरू करीत यश मिळवले. यापुढेही त्यांना उत्तरोत्तर यश प्राप्त होवो, अशा सदिच्छा त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी उपस्थित पत्रकारांनीही त्यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन केले. उपस्थितांच्या प्रेमामुळे भारावून गेलेल्या संदीप गावडे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.