⚡बांदा ता.२९-: भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे बांदा येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाळा आकेरकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, बांदा ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा बांदा विकास सोसायटीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत आदी उपस्थित होते. यावेळी श्री दळवी यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मनीष दळवींचा बांदा भाजपकडून सत्कार…
