बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांची कारवाई…

⚡बांदा ता.२९-: गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी इन्सुली चेकपोस्टवर कारवाई केली. या कारवाईत १ लाख ८० हजार रुपयांच्या दारूसह एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणे मुन्ना जानी शेख (वय ५०, रा. आंध्र प्रदेश) व शरणकुमार व्यंकटराव कोम्मालपाटी (वय २५ रा. तेलंगणा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

बांदा पोलिसांच्या इन्सुली चेकपोस्टवर गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत होती. सोमवारी रात्री उशिरा येणारा पिकप टेम्पो (एपी ३९ व्हीबी ०७३६) तपासणीसाठी थांबविण्यात आला. तपासणी दरम्यान टेम्पोत १०० बॉक्समध्ये एकूण १२०० दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

दारू वाहतुकीसाठी वापरलेली पिकअप गाडी ताब्यात घेण्यात आली. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे व उपनिरीक्षक युवराज झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रथमेश पवार, प्रसाद पाटील, कपिल हळदे व राकेश चव्हाण यांच्या पथकाने केली.

फोटो –
इन्सुली चेकपोस्टवर करण्यात आलेल्या दारू कारवाई मधील संशयित व मुद्देमाल समवेत बांदा पोलीस कर्मचारी.

You cannot copy content of this page