सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवन मध्ये सकाळी ११.३० वा. कार्यक्रमाचे आयोजन..
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-: राष्ट्रीय पातळीवर विविध जलतरण क्रीडा स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल आणि जागतिक जलतरण क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल सिंधुदुर्गनगरी- ओरोस येथील पूर्वा रश्मी संदीप गावडे हिचा नागरी सत्कार राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शनिवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवन मध्ये आयोजित करण्यात आला आहे
सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आणि ओरोस पंचक्रोशीतील नागरीक यांच्या सयुक्त विद्यमाने पूर्वाच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पूर्वा गावडे हिच्या होणाऱ्या या सत्कार सोहळ्यास जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, ओरोस सरपंच आशा मुरमुरे, रानबाबूळी सरपंच परशुराम परब व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत
सिंधुदुर्गनगरी – ओरोस येथील पूर्वाने पाच वर्षाची असल्यापासून पोहण्याचा सराव सुरु केला होता त्यानंतर तीने जलतरण क्रीडा क्षेत्रात पदार्पण करत जिल्हा ,विभाग ,राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश मिळवत गेली आणि लहान वयातच तीने जागतिक पातळीवर जलतरण क्रीडा स्पर्धेत झेप घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कन्येने भारत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे या अभिमास्पद कामागिरी बद्दल पूर्वा गावडे हिचा नागरी सत्कार करण्यात येत आहे या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिक व क्रीडा प्रेमिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर व सचिव दत्तप्रसाद वालावलकर तसेच ओरोस ग्रामस्थांनी केले आहे.