भटवाडी-बाहेरचावाडा प्रभागातील बत्ती होते वारंवार गुल….

नागरिकांना त्रास होत असल्याने नगरसेविका सौ भालेकर आक्रमक;वीजच्या उपकार्यकारी अभियनतांना भेटून दिले निवेदन

*💫सावंतवाडी दि.०३-:* भटवाडी-बाहेरचावाडा प्रभागातील लाईट वेळोवेळी जात असल्याने तेथील नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे आज नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. भटवाडी-बाहेरचावाडा भागात गेल्या दोन महिन्यांपासून घरातील लाईट सह रस्त्यावरील पथदीप यांचा खेळ सुरू असून दिवसातून १०-१५ वेळा जात आहे. यावर वेळोवेळी तक्रार केल्यानंतर तात्पुरता स्वरूपाची दुरुस्ती केली जात आहे. परंतु तरीही अनेक वेळा लाईट जात असल्याने त्याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे मेन लाईन वर आलेली झाडी पावसाळ्यापूर्वी तोडून घ्यावी. तसेच लाईनच्या डी.पी. वर काही बिघाड असल्यास तो तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांनी महावितरण चे उपकार्यकारी अभियंता भुरे यांच्याकडे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर,जहूर शेख, सचिन साटेलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page