पालकमंत्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती..
⚡कणकवली ता.२४-: विमानाने इस्त्रो सफर व लाखो रुपयांची रोख बक्षिसे असलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार रविवार २७ जुलै रोजी स. १०.३० वा. भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना अडीच लाखाची रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
एसटीएस-२०२५ मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील इयत्ता ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने इखो सहलीला नेण्यात आले तसेच २ री व ३ री मधील १० गुणवंत विद्यार्थ्यांना गोवा येथील सायन्स सेंटर ची भेट घडविण्यात आली आहे. इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी
आणि ७ वी मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील २५० विद्यार्थ्यांना रोख अडीच लाखाची रोख बक्षिसे, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. इतर मेडल धारकांची मेडल्स केंद्र संचालक यांच्या मार्फत शाळांबर पाठविण्यात येणार आहे. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा तथा जि. प. माजी अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी केले आहे.
उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. तसेच निकाला दिवशी पालक, शिक्षक, विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे. यावर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापुर, पालघर व ठाणे जिल्हात आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी एसटीएस परीक्षा प्रमुख सुशांत सुभाष मर्गज, प्रमोद पवार यांच्याशी संपर्क साधावा.
चालू वर्षीची परीक्षा १८ जानेवारी २०२६ रोजी
दरम्यान यावर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा एसटीएस- २०२६ ही रविवार १८ जानेवारी २०२६ रोजी होणार असून या परीक्षंसाठी फॉर्म वितरण सुरू झाले आहे. परीक्षेचे हे ९ वे वर्ष असून सिधुदुर्ग जिल्ह्यात ३० परीक्षा केंद्राबर ही परीक्षा होणार आहे. इयत्ता २ री, ३री, ४ थी, ६ वी आणि ७ वी साठी ही परीक्षा मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे
या परीक्षेचे मुख्य परीक्षा केंद्र विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली असून इतर परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे. फोंडाघाट हायस्कूल, जि. प. शाळा खारेपाटण नं. १. वामनराव महाडिक विद्यालय तरेळे, कनेडी हायस्कूल, शिरगाव हाव., शाळा जामसंडे नं १, शाळा कुणकेश्वर नं १, पडेल हाय., रामगढ़ हाय., आचरा हाय., टोपीवाला हाय. मालवण, वराडकर हाय. कट्टा, कुडाळ हाय., न्यू इंग्लिश स्कूल कसाल, मळगाव इंग्लिश स्कूल, कळसुलकर हाय. सावंतवाडी, सैनिक स्कूल आंबोली, शाळा माडखोल नं. १, शाळा मळेवाड नं. १, खेमराज हाय. बांदा, कलंबिस्त हाय., न्यू इंग्लिश स्कूल-दोडामार्ग, न्यू इंग्लिश स्कूल-भेडशी, वेंगुर्ला हाय., अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी