Headlines

सडूरे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करा…

*सरपंच उज्वल नारकर यांची मागणी*

*💫वैभववाडी दि.०२-:* सडूरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी अरुळे सरपंच उज्वल नारकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आमदार नितेश राणे, तहसीलदार रामदास झळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार यांना देण्यात आले आहे. तालुक्यात सध्या वैभववाडी ग्रामीण रुग्णालय तसेच उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र या दोनच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहेत. तालुक्यात दोनच केंद्र असल्याने लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. तालुक्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. शिवाय लॉकडाऊन मुळे दळणवळणाची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीमुळे वृद्ध नागरिकांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरणासाठी येणे शक्य होत नाही. तालुक्यातील शिराळे,कुर्ली ,नावळे ही गावी वैभववाडी पासून सुमारे १५ किल्लोमीटर अंतरावर आहेत. तर सडूरे,अरुळे, सांगूळवाडी, निमअरुळे ही गावे सुमारे १० किल्लोमीटर अंतरावर आहेत. दळणवळणाची व्यवस्था नसलेने येथील नागरिकांना पायपीट करून वैभववाडी येथे येणे शक्य नाही. ग्रामीण भागातील बहुतांश वृद्ध नागरिकांचे याच कारणामुळे अद्यापही लसीकरण झालेले नाही. त्यामुळे या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सडूरे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करावे, जेणेकरून नजीकच्या सहा गावांतील सुमारे सहा हजार जेष्ठ नागरिकांना त्याचा लाभ होईल अशी मागणी अरुळे सरपंचांनी केली आहे. लसीकरण केंद्राकरिता संगणक व संगणक चालक याची भासणारी कमतरता दूर करण्याची जबाबदारी या पंच क्रोशीतील ग्रामपंचायतीनी घ्यावी त्यामुळे तात्काळ लसीकरण केंद्र सुरू करण्यास मदत होईल.

You cannot copy content of this page