पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या महावितरण अधिकऱ्यांना सूचना:धोकादायक पोल बदलून लाईनमन सतर्क ठेवा..
⚡सिंधुदुर्ग दि.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वारा, पाऊस असतो. त्यामुळे जे साहित्य वापरण्यात येते ते चांगल्या दर्जाचे वापरले पाहिजे. तसेच वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवला पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार नको. गणेशोत्सवाचे योग्य नियोजन करा. प्रत्येक गावासाठी एक लाईनमन देण्याचा प्रयत्न करा. नागरिकांचा विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा, अशा सूचना पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्ह्यातील सुरळीत वीज पुरवठ्यासाठी पालकमंत्री नाम नितेश राणे यांनी ही आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद म्हनमोरे, सौरभ माळी, मनीष दळवी, अशोक सावंत, तालुक्यांचे सर्व वीज अभियंता उपस्थित होते.
जिल्ह्यात सर्व तालुक्यात १६०० पोल बदलणे आवश्यक आहेत. पोल उपलब्ध आहेत. दोडामार्ग तालुक्यात लोखंडी पोल हवे आहेत. दुर्गम भाग असलेल्या ठिकाणी सिमेंट पोल द्या व ही कामे तातडीने पूर्ण करा अशा सूचना देखील जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी दिल्या.
गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्यादृष्टीने वीज वाहिन्या सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करा. चांगली सेवा देणाऱ्या वायरमनचा सत्कार करा. विद्युत कामे करणाऱ्या एजन्सीकडून कामे जलद करून घ्या. त्यांना हेड क्वार्टरला थांबवा. त्यांची बैठक घ्या, अशा सूचना देखील पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी दिल्या आहेत.