गुरु आणि शिष्य यांच्या अतूट नात्याचे दर्शन:विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग, नाट्यगीत, बंदिश गायन सादरीकरणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद…
⚡सावंतवाडी ता.२१-: गुरुवर्य संगीत अलंकार दिप्तेश मेस्त्री यांनी स्थापन केलेल्या न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा ‘गुरु अभिवादन सोहळा काल रविवारी मळगाव येथे मोठ्या थाटात व संगीतमय वातावरणात गुरु आणि शिष्य यांच्या अतूट नात्याचे दर्शन घडवत उत्साहात पार पडला.
गुरुपूजनाबरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग, नाट्यगीत, बंदिश गायन सादरीकरणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी व विद्यार्थ्यांच्यावतीने मळगाव येथील श्री भगवती हॉल येथे या भव्य दिव्य अशा या गुरु अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याचे यंदाचे १२ वे वर्ष होते. गुरु अभिवादन सोहळ्याचे उदघाटन गणेश मूर्तीला वंदन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सरस्वती देवीचे व सर्व वाद्यांचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी शेवाळे, तळवणे मठाधिपती तथा सावंतवाडी संस्थान राजगुरु राजेंद्रस्वामी भारती महाराज, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय माजी उपसचिव शांताराम कुदळे, गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संगीत अलंकार दिप्तेश मेस्त्री, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ओरोस शाखा व्यवस्थापक रोहित सोनकवडे, ॲड. चंद्रशेखर गावडे, सचिन देसाई, आनंद माळकर आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी संस्थेमार्फत घेत असलेल्या गायन, हार्मोनियम, शास्त्रीय संगीताच्या वर्गाबरोबरच तबला वादन, बासरी वादन, शास्त्रीय कथ्थक नृत्य आदी संस्था घेत असलेल्या वर्गाबाबत संस्थेचे कौतुक करत संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘जय जगदीश हरे प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
त्यानंतर दिप्तेश मेस्त्री यांनी बरवा रागातील “बाजे मोरी पायलिया” ही बंदिश सादर केली. बंदिशीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अभंग, नाट्यगीत, बंदिश गायन सादरीकरण केले. भोजनानंतर दुपारच्या सत्रात संस्थेतील बाकी विद्यार्थ्यांचे गायन पार पडले. उत्तरोत्तर रंगत गेला. सायंकाळी मुख्य कार्यक्रम गुरुपूजन सोहळा पार पडला. यावेळी पंचारती ओवाळत गुरुवर्य दिप्तेश मेस्त्री यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी एका रांगेत राहून गुरुवर्य दिप्तेश मेस्त्री यांच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर विद्यालयातील ज्येष्ठ विद्यार्थ्यांच्या भैरवी गायनाने गुरु अभिवादन सोहळ्याची सांगता करण्यात आली. या अभिवादन सोहळ्याला मयूर पिंगुळकर, अमित मेस्त्री, पप्पू घाडीगावकर, मनीष तांबोसकर तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देत गुरु अभिवादन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद आडेलकर तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन काका सावंत यांनी केले.
गुरुकुल शिक्षण संस्थेच्यावतीने सुरु असलेल्या तळवडे, सावंतवाडी, कुडाळ, गोवा आदी शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने गुरु अभिवादन सोहळ्याला उपस्थित होते. गुरु अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिप्तेश मेस्त्री, उपाध्यक्ष चंद्रशेखर गावडे, सचिव गीतेश परब, सल्लागार सचिन देसाई, आनंद माळकर, सहसचिव रोहित निर्गुण, खजिनदार दर्शिता मेस्त्री, अजित पोळजी, सुधीर राऊळ, दत्ताराम माळकर, भावेश राणे, प्रसाद आडेलकर, संतोष उर्फ बाबू गोडकर, खेमराज सनाम, पुरूषोत्तम परब, सचिन पांगम, गौरेश पालयेकर, विशाल घोगळे, चिन्मय प्रभूराळकर, अक्षय तांडेल, हर्षल मेस्त्री, अनंत मठकर, नारायण सावंत, दिनेश माजगावकर, गोविंद मेस्त्री, रूपक मातोंडकर, रोहित राऊळ, सिद्धेश सावंत, वासुदेव देसाई, दर्शन केणी, विश्राम गोवेकर, कौशल सुतार, प्रशांत पिरणकर, सुहास पिळणकर , सुमंत राऊळ, गणराज परब, दिप्तेश केळुसकर, वैभव पावसकर, शैलेश गावडे, विवेक करमळकर, गणेश चव्हाण, प्रसाद परब, शेखर गावडे, प्रकाश गावडे, प्रतिभा सातार्डेकर, साक्षी कविटकर, शुभदा कविटकर, दर्शना पाटकर यांनी विशेष मेहनत घेतली.