उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

⚡सावंतवाडी ता.२१-: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक वसंत केसरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, “वाढदिवस म्हणजे एक नवी सुरुवात. आपल्या सर्व जिवलगांना एकमेकांशी घट्ट बांधणारा हा दिवस. आयुष्यातील ओजावर मिळवलेले यश, ज्ञान आणि साथ याबाबत कृतज्ञता आणि खूप समाधानी भावना या दिवशी मनात असतात.”

पुढे उपमुख्यमंत्री म्हणाले, “आपल्या कडून आणि बुद्धिमत्तेच्या बळावर समाजकार्य घडावे आणि राष्ट्र हितासाठी आपले भरीव योगदान लागावे. आपली साथ माझ्यासाठी नेहमीच आश्वासक आहे. पुढील काळातही सतत आनंद, यश आणि आकांक्षाची पूर्तता अशी, या मनःपूर्वक सदिच्छा. ‘जीवेत् शरदः शतम्!'”

You cannot copy content of this page