हळवल, शिरवल, कळसुलीमध्ये गव्यांचा वावर…

वनविभागाने गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा:रुझाय फर्नांडिस यांची मागणी..

⚡कणकवली ता.२१-: तालुक्यातील हळवल, शिरवल, कळसुली, मुख्य मार्गावर गव्याचा कळप वामनवाफा येथे दिवसरात्री अचानक रोडवर धुमाकूळ करत आहे. गेले वर्षभर अनेकदा या गव्यांच्या दर्शनामुळे वाहनचालकांमध्ये भीती निर्माण होवून अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने गवा रेडयांचा कळपाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुझाय फर्नांडिस यांनी केली आहे.

या रस्त्यावर दिवसाला शेकडोंच्या संख्येने वाहनाची वर्दळ असते. हे गवे वामनवाफा येथे शिरवल, हळवल गावात कळपाने ये जा करत असल्याने शेतकर-यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरवल येथील वामनवाफा या वळणावर धोकादायक वळणावर गवे दिवसाढवळ्या अचानक रोडवर असल्याने नवख्या वाहन चालकांना या गावांचा अंदाज येत नाही. या वळणावर वनविभागाने वन्य प्राण्याचा वावर असल्याचा दिशा दर्शक फलक लावावा. जेणेकरून वाहन चालकांना अंदाज येऊ शकतो, अशी मागणी हळवल, शिरवल, कळसुली, ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page