*💫वैभववाडी दि.०२-:* शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या वतीने वैभववाडी आरोग्य केंद्रासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार यांच्याकडे पीपीई किट, मास्क, हॅन्डग्लोज इत्यादी सुपूर्द करण्यात आले. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे या भावनेतून पीपीई किट व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले. खांबाळे ग्रामपंचायत कार्यालय येथे तहसीलदार रामदास झळके, वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, तालुका आरोग्यअधिकारी डॉ. अनिल पवार, मंडळअधिकारी श्री. पावसकर, मंडळ अधिकारी श्री. कदम, आरोग्य सहायक श्री. चव्हाण ,उपसरपंच गणेश पवार, आरोग्यसेविका एस. ए. बोडेकर, आशा स्वयंसेवीका प्राची पवार, दिपक पवार, अंबाजी पवार, रुपेश कांबळे आदी उपस्थित होते.
शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांचेकडून वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला पीपीई किट चे वाटप
