स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त सहभाग..
⚡कुडाळ ता.१९-: महाराष्ट्र जैवविविधता बोर्ड व महाराष्ट्र जनुक कोश यांच्या वतीने, तसेच संत राऊळ महाराज कुडाळ कॉलेज यांच्या सहकार्याने पाट हायस्कूलमध्ये शनिवार दिनांक 19 जुलै रोजी पाणथळ जमीन जागृती करिता विशेष उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी संस्था सदस्य महेश ठाकूर, प्रविण सावंत, पाणथळ जागा अभ्यासक आणि मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, उपक्रम प्रमुख संदीप साळसकर हे उपस्थित होते.
यावेळी पाणथळ जमिनीचे महत्त्व व प्लास्टिकचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले. महेश ठाकूर यांनी जलसुरक्षा या विषयाचे महत्त्व सांगितले. यावेळी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत दोनशे चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यासाठी इयत्ता पाचवी-सहावी साठी ‘जंगल विज्ञान’, ‘नदीचे चित्रण’, ‘सरोवराचे दृश्य’ यावर चित्रण केले. तर इयत्ता सातवी आणि आठवीने ‘पृथ्वी वाचवा’, ‘प्रदूषण मुक्त जग’, ‘झाडांचे महत्त्व आणि पक्षा प्राण्यांची घरे’ या विषयावर चित्रण केले .सर्व स्पर्धकांनी काढलेली चित्रे पाहून संस्था संचालक आणि मुख्याध्यापक यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. संत राऊळ महाराज कुडाळ कॉलेज आणि महाराष्ट्र जैवविविधता यांच्या वतीने हा उपक्रम पाट हायस्कूल विद्यालयात यशस्वीपणे पार पाडला.