कुडाळ : सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रानभाजी पाककला स्पर्धा रविवार, दिनांक 20 जुलै रोजी, दुपारी 4:00 वाजता आयोजित केली आहे.
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी शिजवलेली रानभाजी स्पर्धेसाठी आणावी. तसेच सोबत नमुना म्हणून अल्प प्रमाणात ती रानभाजी आणावी. रानभाजीची पाककृती व आरोग्यासाठी तिचे महत्त्व एका स्वतंत्र कागदावर लिहून आणावे, स्पर्धकाने त्यावर आपले नाव लिहू नये.
स्पर्धा मराठा समाज भगिनी मंडळ बालवाडीच्या इमारतीत घेण्यात येईल. परीक्षकांचे निर्णय अंतिम राहतील.
प्रथम तीन क्रमांकाला व उत्तेजनार्थ दोन अशी आकर्षक पारितोषिके देण्यात येतील.
नाव नोंदणीसाठी तसेच संपर्कासाठी सौ.अदिती सावंत (8698360350) किंवा सौ. अदिती दळवी (9923300366) यांच्याशी संपर्क साधावा.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन भगिनी मंडळाच्या अध्यक्षा सौ. प्रज्ञा प्रशांत राणे यांनी केले आहे.
कुडाळ मध्ये २० जुलैला रानभाजी पाककला स्पर्धा…
