बांध्यात रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला…!

⚡बांदा ता.१८-: बांदा येथिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदा आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान (शाखा सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. मंडळ कार्यकर्ते, व्यापारी, युवक तसेच महिलांनी सहभागी होत ९२ दात्यांनी रक्तदान केले. ओरोस येथिल रक्तपेढीने तसेच गोवा बांबोळी येथील रक्तपेढीने रक्त संकलनाचे काम केले. यावेळी ३ जणांनी देहदान व ४ जणांनी अवयवदान अर्ज भरून संस्थेकडे सुपूर्द केलेत.

    बांदा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, सिंधु रक्तमित्रचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, उपसरपंच आबा धारगळकर, मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार, सचिव दादा पावसकर, खजिनदार विठ्ठल वाळके, सिंधु रक्तमित्रचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, जावेद खतीब, शामसुंदर मांजरेकर, प्रशांत बांदेकर, साई काणेकर, गुरु सावंत, सुधीर पराडकर, रुपाली शिरसाट, श्रेया केसरकर, तनुजा वराडकर, रिया येडवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्रकाश तेंडोलकर यांनी रक्तदानचे महत्व फायदे सांगून देहदान व अवयवदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मान्यवरांचे स्वागत सर्वेश गोवेकर, ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके, निलेश कदम, ज्ञानेश्वर येडवे, निखिल मयेकर, प्रसाद वाळके अर्णव स्वार, अक्षय मयेकर, ऋषी हरमलकर, प्रथमेश गोवेकर, गौरव नाटेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले. आभार सर्वेश गोवेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page