⚡बांदा ता.१८-: माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय आरोस-दांडेली येथे बँक ऑफ इंडिया व माऊली महिला मंडळ शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सरी व्यवस्थापन व कलम बांधणी प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन माऊली महिला मंडळ अध्यक्षा रेखा गायकवाड, समाजसेविका अलका नारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाच्या संचालिका श्रीमती कुडतरकर, आजगाव सरपंच सौ. यशश्री सौदागर, श्रीमती गाडगीळ तसेच मंडळाच्या सदस्या श्रीमती कदम, बँक ऑफ इंडियाचे श्री कासले आदी उपस्थित होते. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी स्वावलंबी आयुष्य कसे जगावे व छोट्या उद्योगातून मोठे यश कसे मिळवावे याबद्दल मार्गदर्शन केले व उपस्थितांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
संस्थेच्या अध्यक्षा रेखा गायकवाड या वयाची ८० वर्षे झालेली असताना सुद्धा दिव्यांग व सर्वसाधारण मुलांसाठी असे प्रशिक्षण राबवित त्यांना स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातून त्यांची विद्यार्थी व त्यांच्या आयुष्यासाठी असलेली तळमळ दिसून येते असे उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्ही. काळे यांनी केले व आभार मुख्याध्यापक एस. एस. उकरंडे यांनी मानले.
फोटो:-
आरोस येथे प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन करताना मान्यवर.
माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय मध्ये नर्सरी व्यवस्थापन व कलम बांधणी प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न…
