मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश…

विभव राऊळ तालुक्यात दुसरा व जिल्ह्यात तिसरा :सारा नाईक तालुक्यात दुसरी व जिल्ह्यात एकोणिसावी..

⚡सावंतवाडी ता.१०-: शिष्यवृत्ती परीक्षा 2024 -25 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे शिष्यवृत्ती पटकावत उज्वल यशाची परंपरा कायम राखली. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) प्रशालेचे तेरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहरी सर्वसाधारण गटातून कु.सारा सुहेल नाईक हिने तालुक्यातून दुसरा व जिल्ह्यातून 19 वा क्रमांक पटकावत शिष्यवृत्ती संपादित केली

तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता आठवी) प्रशालेचे आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहरी सर्वसाधारण गटातून कु विभव विरेश राऊळ याने तालुक्यातून दुसरा व जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटकावत उत्तुंग यश संपादित केले. तसेच कु. मानसी परमेश्वर सावळे हिने तालुक्यातून 12 वा व जिल्ह्यातून 34 वा क्रमांक पटकावला व कु.राधिका विश्वास सोनाळकर हिने तालुक्यातून 16वा व जिल्ह्यातून 49 वा क्रमांक पटकावत शिष्यवृत्ती मिळवली. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका श्रीम.अनुजा साळगावकर, श्रीम. प्रेरणा भोसले, श्रीम.फरजाना मुल्ला, श्री. योगेश चव्हाण, श्री. गोविंद प्रभू, श्रीम.लविना आल्मेडा ,श्रीम. प्रणिता मयेकर या शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲडव्होकेट श्री. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉक्टर श्री.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page