“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” मानत जनतेच्या सेवेत समर्पित राहणार…

विशाल परब:दोडामार्ग येथील शासकीय रुग्णालयाला विशाल परब फाउंडेशनच्या माध्यमातून व्हील चेअरसह अन्य वैद्यकीय साहित्य प्रदान..

⚡दोडामार्ग ता.१०-: दोडामार्गमधील ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य सुविधेमधील अडचणींबद्दल मला पूर्ण
जाण आहे. तळागाळातील गोरगरीब व्यक्तींना आजारपणात मदतीचा हात देता यावा, याकरिता “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” मानून व्यक्तिगत पातळीवर मला जेवढे काही करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी निश्चितपणे करणार. परंतु, शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर इथल्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य सेवेला प्राधान्य मिळून ही सेवा खऱ्या अर्थाने लोकाभिमुख व्हावी यासाठी आम्ही सर्वजण एकत्रपणे काम करू, असे प्रतिपादन युवा उद्योजक तथा विशाल सेवा फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष श्री विशाल परब यांनी आज दोडामार्ग येथील शासकीय रुग्णालयात बोलताना केले.

कार्यक्रम स्थळी युवा उद्योजक श्री विशाल परब यांच्यासह दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.येडगे, डॉ.मसुरकर, डॉ.रेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी श्री. रंगनाथ गवस, शिरीष नाईक, महेश गवस, दिवाकर सावंत, समीर गवस, नागेश पर्येकर, जनार्दन नाईक, निलेश शिरोडकर, दादा रेडकर, संदीप देसाई, नाना देसाई, हरिचद्र शेठकर, समीर लोंढे, संकेत शेट्ये, नंदराज शेट्ये, निलेश धरणे, श्याम गवस, संजय ऊसपकर, प्रमोद दळवी, मनोज गवस प्रशांत, गवस नारायण गवस, सचिन नाईक, सखाराम झोरे, राजन नाईक, महादेव गवस, प्रदीप गावडे, सुनील सावंत या विशाल सेवा फाउंडेशन व श्री विशाल परब मित्र मंडळाच्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी केलेले योग्य नियोजन कौतुकास्पद ठरले.

या कार्यक्रम प्रसंगी श्री विशाल परब यांच्या माध्यमातून दोडामार्गमधील सामान्य रुग्णांची गैरसोय दुर व्हावी यासाठी या ग्रामीण रुग्णालयाला व्हील चेअरसह मॅन्युअल बीपी चेक मशीन, स्टेथोस्कोप, पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर आदी रुग्णोपयोगी वैद्यकीय साहित्य प्रदान करण्यात आले. दोडामार्गमधुन या स्तुत्य उपक्रमाबद्दल युवा उद्योजक श्री विशाल परब आणि सहकाऱ्यांचे कौतुक होताना दिसून येत आहे.

You cannot copy content of this page