प्रिया चव्हाण आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्या मुलाला पोलिसांनी ताबडतोब अटक करावी…

अन्यथा, रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू: माजी आमदार वैभव नाईक यांचा इशारा..

सावंतवाडी : सावंतवाडीतील विवाहीता प्रिया चव्हाण हीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्ष प्रणाली मानेंसह मुलाला पोलिसांनी ताबडतोब अटक करावी. तसेच याप्रकरणी संशयित आरोपी प्रणाली मानेचे पती मिलिंद माने यांनाही आरोपी कराव. अन्यथा, रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला. सावंतवाडी येथील चव्हाण कुटुंबियांची श्री.नाईक यांसह माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक आदींनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

यावेळी श्री. नाईक पुढे म्हणाले, गुन्हा दाखल झालेल्या प्रणाली माने भाजपच्या पदाधिकारी आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी निःपक्षपातीपणे तपास करून याच्या मुळाशी जावं. गृहखात भाजपकडे असलं तरी सत्ताधारी पक्ष असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणी तपास करून गुन्हा दाखल केलेला नाही. माहेरच्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी संशयीत दोन्ही आरोपींना अटकपूर्व जामिनासाठी संधी न देता तात्काळ अटक करावी. तसेच संशय आरोपीचे पती मिलिंद माने यांनाही आरोपी केलं पाहिजे. त्यांच्याकडून अनेक लोकांना असा त्रास दिला गेला आहे‌. वेगवेगळ्या कारणांसाठी देवगड पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. संबंधित सत्ताधारी पक्षाचे असल्याने पक्षपात होण्याचा संशय आम्हाला आहे. त्यामुळे योग्य तपास होऊन तात्काळ अटक न झाल्यास प्रसंगी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा श्री नाईक यांनी दिला.

दरम्यान, माजी आमदार श्री. उपरकर म्हणाले, चव्हाण कुटुंबियांची भेट घेत आम्ही सांत्वन केलं. घडलेल्या घटनेप्रमाणे संबंधितावर कारवाई झाली पाहिजे. योग्य तो न्याय चव्हाण कुटुंब व मुलीच्या आई-वडीलांना मिळाला पाहिजे. आम्ही या कुटुंबासोबत आहोत. पोलिसांनी तपास करून योग्य न्याय द्यावा, संबंधित संशयितांचे मोबाईल ताब्यात घ्यावे असं मत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, उबाठा शिवसेनेचे नेते सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख निलम पालव, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, देवगड तालुकाप्रमुख रविंद्र जोगल, अशोक धुरी, जिल्हा संघटक शब्बीर मणियार,
मायकल डिसोझा, शैलेश गौंडळकर,हर्षा ठाकुर, विशाल मांजरेकर, निलम सावंत, रेश्मा सावंत, अनुप नाईक, आशिष सुभेदार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page