धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबईच्या अध्यक्षपदी डॉ प्रदीप मिराशी…

तर कार्याध्यक्षपदी प्रदीप गोपाळराव परब मिराशी बिनविरोध
निवड..

⚡मालवण ता.०७-:
धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. प्रदीप शिवराम मिराशी तर कार्याध्यक्षपदी प्रदीप गोपाळराव परब मिराशी यांची फेर निवड झाली आहे

धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई या संस्थेची सर्वसाधारण सभा मुंबई येथे संपन्न झाली. यावेळी झालेल्या निवडणुकीत सर्व सदस्यांची बिनविरोध फेर निवड करण्यात आली.

या सभेत संस्थेच्या उपकार्याध्यक्ष पदी मोहम्मद इकबाल काझी, सचिव ॲड सुभाष राजाराम आचरेकर सहसचिव सूर्यकांत भगवान कोकम खजिनदार मंगेश बाळकृष्ण आचरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून निवडून आलेले इतर सदस्य प्रवीण काशिनाथ कानविंदे, मोहन गंगाराम आचरेकर,शशांक मोहनराव गुळगुळे , संजय सहदेव पाडावे यांची निवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page