⚡सावंतवाडी ता.०७-: माठेवाडा येथील प्रिया चव्हाण या विवाहितेने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या करून आपले जीवन संपविले होते. हि आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मयत प्रिया हिच्या वडिलांनी पोलिस तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान आज मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, शहर अध्यक्ष राजू कासकर, कलंबिस्त येथील माजी तालुका उपाध्यक्ष भाई देसाई व अन्य पदाधिकाऱ्यांनी मयत प्रिया चव्हाण यांच्या वडिलांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. तसेच मनसे आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली. दरम्यान या गुन्ह्याचा कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता तपास करण्याची मागणी ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.