कोरोना बाधितांना विनाकारण होम आयसोलेशन नको…

कोविड केअर सेंटरला बेड उपलब्ध असल्यास तेथे उपचार दया;जी प अध्यक्षा संजना सावंत यांची मागणी

*💫देवगड दि.३०-:* विनाकारण होम आयसोलेशन नको. जर सोय नसेल तर पेशंटला कोविड केअर सेंटर मध्ये हलवा. अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संजना सावंत यांनी दिल्या. देवगड येथे कोरोना व जल जिवन मिशन यासाठी विशेष ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी बोलताना ज्यांची संडास बाथरूमची स्वतंत्र सोय नाही अशा पेशंटना होम आयसोलेशन मध्ये ठेवता येणार नाही. त्यांना सेंटरमध्ये हलवा अशा स्पष्ट सूचना सर्व सरपंचांना केल्या आहेत. या सभापती रवी पाळेकर, व माजी शिक्षण सभापती सावी लोके, व अन्य सगळे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याला 12 नवीन रुग्णवाहिका येत आहे. तोपर्यंत गरज असल्यास भाड्याने रुग्णवाहिका घ्या. मात्र कोविड साथीमध्ये कुणालाही त्रास होता कामा नये. असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी बैठकीत व्यक्त केले. हे उत्तर इळये गावचे सरपंच जयदेव कदम यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. त्यांनी सांगितले कोविड बाबत योग्य ती काळजी घ्या, दक्षता घ्या व नियम पाळा असे आवाहनही त्यांनी केले. सुरुवातीला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष कोंडके यांनी देवगड मधील कोरोना विषयक सविस्तर अहवाल दिला.

You cannot copy content of this page