⚡बांदा ता.०६-: जिल्हा परिषद शाळा डेगवे मिरेखण शाळेच्यावतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित केलेली वारकरी दिंडी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विठ्ठल रुक्मिणी वेशभूषेमुळे लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांच्या या वारकरी दिंडी मुळे डेगवे मिरेखण परिसरात विठ्ठलमय वातावरण निर्माण झाले.त्याच सोबत अभंग गायन, वृक्षारोपण, गणवेश वितरण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक कोळापटे सर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे महत्व कळावे, या उद्देश्याने विदयार्थी या वारकरी दिंडीत विद्यार्थी विठ्ठल- रखुमाई , विविध संत व वारकरी यांच्या वेशभूषा करून सहभागी झाले होते.या दिंडीत विद्यार्थ्यांनी केलेला रिंगण सोहळा, फुगड्या, विठ्ठल नामाचा जयघोष आकर्षक ठरला.शाळेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंगगायन,फुगड्यांना उपस्थित विठ्ठल भक्तांची वाहवा मिळाली. ही आनंददायी वारी,गणवेश वाटप, दिंडी, अभंगगायन, वृक्षारोपण, अभंग गायन मधील विजेत्यांना बक्षीस वितरण हे सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश कोकरे, उपाध्यक्ष राजन सावंत, सदस्य प्रदीप देसाई, मनोज देसाई, अशोक कोकरे, मुख्याध्यापक आनंद कोळपटे,उपशिक्षक सौरभ खोत, अंगणवाडी सेविका विद्या देसाई, मदतनीस अक्षरा सावंत स्वयंपाकीसमीक्षा सावंत, ग्रामस्थ व पालकांनी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक आनंद कोळापटे यांनी केले तर उपशिक्षक सौरभ खोत सर यांनी आभार मानले
डेगवे मिरेखण शाळेत अवतरले विठ्ठल रुक्मिणी…
