समृद्धी कोंडस्कर, विशाल गावडे, तन्वी गावडे, अथर्व ठुंबरे यांचे यश..
कुडाळ : एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित माध्यमिक विद्यालय माड्याची वाडी येथे आषाढी एकादशी निमित्त भक्ती गीत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी समृद्धी कोंडस्कर हिने पहिला क्रमांक पटकावला.
मुख्याध्यापक अनंत सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्रीम. आजगावकर मॅडम यांनी भक्ती गीताबद्दल थोडक्यात माहिती सांगीतली. त्यानंतर भक्ती गीत गायनाला सुरुवात झाली. इयत्ता नववीची विद्यार्थ्यांनी तन्वी गावडे हिने हरिनामाची शाळा भरली हे गीत सादर करून स्पर्धेची सुरवात केली. आठवी, नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध भक्ती गीते सादर केली. त्यामध्ये पराग गावडे, विशाल गावडे, प्रफुल्ल गावडे, धनश्री राणे,अथर्व ठुमरे लावण्या परब,अक्षय जाधव व समृद्धी कोंडस्कर यांनी विठ्ठलावर आधारित भक्ती गीते गायीली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे परीक्षण श्रीमती आजगावकर व श्री नाईक यांनी केले.योग्य परीक्षणाद्वारे क्रमांक काढण्यात आले. त्यामध्ये पहिला क्रमांक इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी समृद्धी कोंडस्कर दुसरा क्रमांक नववीतील विद्यार्थी विशाल गावडे व तृतीय क्रमांक नववीतील तन्वी गावडे तर उत्तेजनार्थ म्हणून अथर्व ठुंबरे याला गौरविण्यात आले. सर्व यशस्वी स्पर्धकांना मुख्याध्यापकांच्या हस्ते व सर्व शिक्षकां मार्फत गौरविण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री राणे सर यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. संस्था चालकानी या सर्व कार्यक्रमाचे कौतुक केले.