कुडाळ कोर्टाच्या वतीने कुडाळ हायस्कुलमध्ये अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा…

कुडाळ : येथील दिवाणी न्यायालय कुडाळ तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळ व वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विद्यमाने कुडाळ हायस्कूल जुनिअर कॉलेज कुडाळ येथे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दिनाचे औचित्य साधून एका शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम आणि पोस्को कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेजचे सह प्राचार्य श्री साळवी सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात वकील राजीव बिले यांनी अमली पदार्थांचे सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वकील संजय रानडे यांनी POCSO Act या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीमती नाखरे मॅडम यांनी केले. कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेज कुडाळचे प्राध्यापक अजित व्हनमानेयांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला 85 ते 90 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची व्यवस्था दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक आर टी आरेकर व चपराशी श्री कडव यांनी केली.

You cannot copy content of this page