आमदार दीपक केसरकर:उद्धव ठाकरेंना राज ठाकरे हिंदुत्व शिकवतील. मात्र, राज ठाकरेंवर पुन्हा अन्याय होणार नाही ही अपेक्षा..
⚡सावंतवाडी ता.०६-: पालकमंत्री नितेश राणे यांचा नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. त्यांनी वाद निर्माण होऊ दिले नाहीत. एकत्र काम केल्यानं जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास निश्चित होईल असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. केसरकर यांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे या नितेश राणेंच्या विधानाबाबत विचारलं असता ते बोलत होते.
श्री. केसरकर म्हणाले, नौका बुजविण्यावेळी वाद निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, वाद न होऊ देता समजूतदारपणा त्यांनी दाखवला. देवगडला देखील ॲक्वेरीयम होत आहे. त्यामुळे पर्यटनाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही असं त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोणत्याही जिल्ह्यात दोन कारागृह नाहीत. सिंधुदुर्गात क्राईम रेट कमी आहे. त्यामुळे ओरोस येथील कारागृह पुरेसं आहे. सावंतवाडीतील जेल हे १५० वर्षांपूर्वीच आहे. त्यामुळे जेल टुरिझमची संकल्पना येथे राबवू शकतो. पर्यटकांना वेगळा अनुभव आपण देऊ शकतो. पहिलं जेल पर्यटन सिंधुदुर्गत होऊ शकत. दुर्देवाने अपघात झाला. मात्र, आज सर्व कैदी ओरोसला हलविले आहेत. त्यामुळे हे जेल पर्यटनासाठी वापरावं. सावंतवाडीला मोठा ऐतिहासिक वारसा असल्याने नाविन्यपूर्ण पर्यटन उपक्रम सुरू झाले तर त्याचा फायदा होईल असं मत आम. केसरकर यांनी व्यक्त केले. तसेच उद्धव ठाकरे हे फतव्याच्या मतांवर अवलंबून आहेत. उद्धव ठाकरेंना राज ठाकरे हिंदुत्व शिकवतील. मात्र, राज ठाकरेंवर पुन्हा अन्याय होणार नाही ही अपेक्षा आहे.यूझ ॲण्ड थ्रो ही उद्धव ठाकरेंची निती आहे. याचा अनुभव मी घेतला आहे असंही ते म्हणाले. तर महाराष्ट्रात मारामाऱ्या, भांडण नको अशी अपेक्षा आहे.मराठीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड झालेली नाही असं मत त्यांनी व्यक्त केले.