हळवल गावचे मानकरी व प्रतिष्ठित नागरिक गोविंद परब यांचे निधन…

कणकवली :
हळवल गावचे मानकरी व प्रतिष्ठित नागरिक गोविंद यशवंत परब (रा. हळवल परबवाडी, वय 85 ) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. गोविंद परब हे हळवल गावचे प्रमुख मानकरी होते. अत्यंत मनमिळावू आणि सुस्वभावी व्यक्ती म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाणाण्याने हळवल गावात दुःख व्यक्त केले जात आहे. गोविंद परब यांच्यावर हळवल येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सूना, मुली नातवंडे, पुतणे, जावई, भावजय असा परिवार आहे. गोविंद परब हे पत्रकार उमेश परब यांचे काका होत.

You cannot copy content of this page