⚡सावंतवाडी ता.०६-: आषाढी एकादशीनिमित्त येथील संस्थानकालीन विठ्ठल मंदिराच्या पूजेचा मान यंदा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांना देण्यात आला. यावेळी सर्व भाविकांनी मोठ्या उत्साहाने श्री चे दर्शन घेतले. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.दिवसभर विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांची मांदीयाळी विठ्ठल मंदिरात होती. विठू नामात सावंतवाडी नगरी दुमदुमून गेली होती.
प्रतिपंढरपूर मानलं जाणाऱ्या सावंतवाडी विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी स्नान पुजेचा मान यंदा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सौ. संजना परब यांना प्राप्त झाला. कन्या वैष्णवी परब उपस्थित होती. पहाटे काकड आरतीनं उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर विठ्ठल-रखुमाईला दह्या, दुधाचा स्नान विधी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पार पडला. सकाळपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी मंदीरात केली होती. दुपारी अभंग, भक्तीगीत, भजनाचे कार्यक्रम झाले. दिवसभर विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांची मांदीयाळी होती. विठू नामाच्या गजरात सावंतवाडी नगरी दुमदुमून गेली होती. सायंकाळी किर्तन सेवा व अभंग गायनाच आयोजन करण्यात आले.