सिवर्ल्ड प्रकल्प व पर्यटन क्षेत्रातील समस्या निवारण्यासाठी पर्यटनमंत्री सकारात्मक…

बाबा मोंडकर :पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे वेधले लक्ष..

⚡मालवण ता.०५-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतराष्ट्रीय सिवर्ल्ड प्रकल्प चालू करण्यात यावा तसेच पर्यटन क्षेत्र विकसीत करण्यासाठी पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यात याव्यात अशा मागण्या भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी राज्याचे पार्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. पर्यटन क्षेत्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी सरकार सकारात्मक असून याविषयी मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्याची माहिती बाबा मोंडकर यांनी दिली आहे.

भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन पर्यटनविषयक विविध समस्यांबाबत लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी दहा लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. या व्यवसाय वाढीसाठी अडचणी दूर करणे आवश्यक आहे. न्याहारी निवास धारक यांची ऑनलाईन न प्रकिया सुलभ हावी, न्याहारी निवासधारक यांना नोंदणी फी न घेता बुकिंग वर कमिशन घ्यावे, २० वर्षात एकही बुकींग निवासधारकांना पर्यटन महामंडळाकडून मिळाले नाही यात बदल व्हावा तसेच पर्यटन महामंडळाची स्वतःची निवास व्यवस्था चे बुकींग झाल्यावर निवास धारकांना बुकिंग मिळावे, कोकणातील आंबे, काजू, सुपारी शेती क्षेत्राचा विचार करता कृषी पर्यटन प्रकल्प मर्यादा ४० गुंठे वरून कमीत कमी १० गुंठे वर आणण्यात यावी, कोकणातील नगरपालिका, नगरपंचायत कार्य क्षेत्रात कृषी पर्यटन प्रकल्पास मान्यता द्यावी, हॉटेल व्यवसायाला उद्योग दर्जा असल्याने वीज आकारणी ओद्योगिक दराने करण्यात यावी, कोकणातील जलपर्यटन मुदत दरवर्षी १० जून पर्यंत करण्यात यावी, कोकणातील धरण, नदी, तलाव क्षेत्रात जलपर्यटन व्यवसायास बारमाही परवानगी द्यावी, पर्यटन व्यवसाय परवानगी जिल्हास्तरावर एक खिडकी पध्धतीने देण्यात यावा, कोकणातील कातळशिल्पे पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आवश्यक सुविधा करण्यात याव्यात, कोकणातील गड किल्ले पुनर्जीवित करून पर्यटन वाढीसाठी नियोजन करावे, कोकणातील ब वर्ग, क वर्ग पर्यटन निधीतुन खर्च झालेली मंदिरे धार्मिक पर्यटन स्थळे म्हणून पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी पॉलिसी बनवावी, गोवा राज्याच्या धर्तीवर टू व्हीलर व्यवसायाला पर्यटन वाढीसाठी वाहतूक परवाना द्यावा, कोकणातील स्थानिक संस्कृती, कला, दशावतार पर्यटकांपर्यंत पोहचण्यासाठी कल्चर सेंटर उभारण्यात यावे, कोकणात पर्यटन पूरक उभारणीसाठी अनुदान द्यावे, पर्यटन संचानालय कोकण विभागासाठी जिल्हास्तरीय अधिकारी नियुक्त करावा, कोकणातील गडकिल्ले, बीच, ऍग्रो, हिस्ट्री, कल्चर, मेडिकल, हिल, जंगल, कांदळवन सफर जलपर्यटन, साहसी पर्यटन प्रकल्पची गाव निहाय यादी करून सरकारी वेब पोर्टलवर प्रसिद्धी द्यावी, कोकणातील समुद्र किनारी असलेल्या सरकारी शेरे जमीन पर्यटन व्यवसायासाठी देण्याची पॉलिसी बनवावी, कोकण पर्यटन विकास आराखडा बनविण्यात यावा, अशा विविध मागण्या बाबा मोंडकर यांनी पर्यटन मंत्री ना. देसाई यांच्याकडे केल्या. सिवर्ल्ड प्रकल्प व पर्यटन क्षेत्रातील समस्या निवारण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे यावेळी पर्यटन मंत्री ना. देसाई यांनी सांगितले.

You cannot copy content of this page