⚡मालवण ता.०५-:
मालवण मेढा येथील श्री शंकर मंदिरात वार्षिक आषाढी एकादशी उत्सव दि. ६ व ७ जुलै रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आषाढी एकादशी दिवशी सकाळी ९ वाजता श्री कृष्ण मूर्तीची वाजत गाजत आगमन मिरवणूक काढून मूर्ती मंदिरात विराजमान करण्यात येणार आहे. यानंतर तारकर्ली, देवबाग, पाट यासह स्थानिक भजने होणार आहेत. त्यानंतर दिंडी काढण्यात येणार आहे. तर सायंकाळी बाळगोपाळांची दिंडी, सायंकाळी ७. ३० वा. देवबाग येथील दिंडी भजन, रात्री ९ वा. स्थानिक तीन वाड्यातील महिलांचे दिंडी भजन होणार आहे. तर रात्रभर अखंड हरीनाम जप होणार असून दुसऱ्या दिवशी दि. ७ रोजी पहाटे ४ वाजता काकड आरती, सकाळी ८. ३० वा. गायन कार्यक्रम, सकाळी १०. ३० वा. गाऱ्हाणे व नवस फेडणे व बोलणे कार्यक्रम होणार आहे. तर सकाळी ११ वा. वाजत गाजत श्रीकृष्ण मूर्ती विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शंकर मंदिर ट्रस्ट व स्थानिक नागरिक यांच्यावतीने करण्यात आले आहे.