⚡सावंतवाडी ता.०४-: वेत्ये, श्री कलेश्वर विद्या मंदिर वेत्ये येथील विद्यार्थी आणि अंगणवाडीतील मुलांना आज वेत्ये ग्रामपंचायतीतर्फे वह्या, पेन, तेल खडू आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले. सरपंच श्री. गुणाजी गावडे यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी उपसरपंच श्री. महेश गावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. राजेंद्र आंबेकर, पोलीस पाटील श्री. रमेश जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती सायली गावकर, श्री. परशुराम पाटकर, श्री. पुंडलिक देऊलकर, श्री. सत्यवान गावडे, श्री. शेखर खाबल, श्री. भरत जाधव, श्री. उत्तम गावडे आणि श्री. तन्मय पाटकर हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सरपंच श्री. गुणाजी गावडे यांनी, “आपण करत असलेले हे काम शाळा आणि मुलांच्या विकासासाठी आपली एक सेवा आहे. असेच करत राहू आणि आपले सहकार्य असेच कायम राहील,” असे सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शीतल गावीत यांनी, सरपंच श्री. गुणाजी गावडे हे दरवर्षी शाळेला अशा प्रकारे वस्तूंचे वाटप करत असतात आणि त्यांचे शाळेसाठी वेळोवेळी अविस्मरणीय सहकार्य लाभते, असे मनोगत व्यक्त केले व त्यांचे आभार मानले.
यावेळी उपसरपंच श्री. महेश गावडे, सदस्य श्री. राजेंद्र आंबेकर, श्री. पुंडलिक देऊलकर आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती सायली गावकर यांनीही सरपंचांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.