देवबाग येथील विठ्ठल- रखुमाई मंदिरात हरीनाम सप्ताह व आषाढी एकादशी सोहळा…

⚡मालवण ता.०४-:
देवबाग येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दि. ३ ते १० जुलै या कालावधीत हरिनाम सप्ताह तसेच दि. ६ जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त ६ रोजी पहाटे ४.३० वाजता काकड आरती, पहाटे ५.३० वाजता नित्य पूजा, सकाळी ७ वा. पासून रात्रौ १२ वा. पर्यंत मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून देवदर्शन व ओटी भरणे, सकाळी ९ वा. पासून ग्रामस्थांची वारकरी भजने, संध्याकाळी ४.३० वा. पासून भांजी (देवबाग) ; भाटकर (देवबाग); व तारी (तारकर्ली) यांचे दिंडीचे श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात आगमन, संध्याकाळी ७ वा. ग्रामस्थांचे वारकरी भजन होणार आहे. तरी सर्व देवबाग ग्रामस्थ व सर्व भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष- श्री देव विठोबा देवालय देवबाग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page