पळसंब येथील जिल्हास्तरिय बुद्धिबळ स्पर्धेत रुद्र मोबारकर, स्वरित कोल्हे प्रथम…

⚡मालवण ता.०४-:
श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब व पळसंब शाळा न. १ यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मोठ्या गटात रुद्र मोबारकर तर छोट्या गटात स्वरित कोल्हे याने प्रथम क्रमांक पटकवला. जिल्ह्यातील ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- मोठा गट – प्रथम – रुद्र मोबारकर (एम. आर. देसाई हायस्कूल वेंगुर्ला),
द्वितीय – तनिष्का आडेलकर (विद्यामंदिर हायस्कुल कणकवली), विधाता सावंत वेगुर्ले नगरसेवक पुरस्कृत), तृतीय – चैतन्य फातर्पेकर (भेडशी हायस्कुल – दोडामार्ग), लहान गट – प्रथम- स्वरित कोल्हे (रोझरी इंग्लिश मिडियम मालवण), द्वितीय – प्रतिक देसाई (मिलाग्रिस सावंतवाडी) तृतीय – रुद्र ठाकुर (विद्या निकेतन कसाल).

या स्पर्धेचे उदघाटन कोकण मराठी साहित्य परिषद मालवण चे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाले. प्रास्ताविक प्रमोद सावंत यांनी केले. यावेळी सेवानिवृत उपमुख्य कार्यकारी राजेंद्र पराडकर, मुख्याध्यापक विनोद कदम, मंडळाचे आजीव सभासद दिगंबर साटम, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश परब, शालेय अध्यक्ष रविकांत सावंत, मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, सचिव चंद्रकांत गोलतकर, अमित पुजारे, अक्षय परब, वैभव परब, हितेश सावंत, शेखर पुजारे, रामचंद्र पुजारे व नॅशनल पंच श्रीकृष्ण आडेलकर, बुद्धिबळपटू शनिलेश सरजोशी, रुद्र सरजोशी, राजेश मुणगेकर, निनाद पेडणेकर, शिक्षिका सोनगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यानिमित्त शाळेच्या आवारात सुपारीच्या झाडाचे वृक्षारोपण निलेश सरजोशी व राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश ठाकूर, राजेद्र पराडकर, नॅशनल बुद्धिबळ पंच श्रीकृष्ण आडेलकर यांनी मनोगत व्यक्त करत मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. तर पळसंबचे माजी सरपंच व मंडळाचे सचिव चंद्रकांत गोलतकर यांनी स्पर्धेस मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आणि सर्वांच्या सहकार्याबद्दल आणि पुरस्कर्त्यांचे आभार मानले.

या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र अशा स्वरूपात बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला पळसंब गावचे सरपंच महेश वरक, उपसरपंच अविराज परब, ग्रामसेवक अमित कांबळी, पोलीस पाटील पूनम गोलतकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सौ. अपूर्वा पवार व सौ. सोनगट्टे यांनी केले.

You cannot copy content of this page